राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; वेगवेगळ्या चर्चांना वेग

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; वेगवेगळ्या चर्चांना वेग

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ही भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र नेमकी काय चर्चा होत आहे. कोणत्या विषयावर खलबते होत आहेत. राज ठाकरे भाजप-शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होणार का याविषयी चर्चा रंगल्या आहेत.

राज ठाकरे यांनी ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली आहे. हे गुलदस्त्यात आहे. तर मनसे पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर ही भेट होत आहे, असे म्हटले जात आहे.

तर एबीपी वाहिनीच्या माहितीनुसार बीडीडी चाळ घरांच्या किंमती संदर्भात, शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात या चर्चा होत आहेत.  

Leave a Comment