पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला केला, भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मीच सांगतो, तुमच्या हाती देशाची सत्ता आहे,
तुमची सगळी शक्ती वापरा आणि राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला वाटेल ती शिक्षा करा. आम्ही तुमच्या बरोबर राहू, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवारांची पहिलीच सभा शनिवारी येवल्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. मी माफी मागण्यासाठी आलो आहे.
तसा माझा अंदाज चुकत नाही; पण या ठिकाणी चुकला. मी ज्याचे नाव पुढे केले, त्याला तुम्ही निवडून दिले आहे. त्यामुळे माझे कर्तव्य आहे म्हणून माफी मागायला आलो आहे. माफी मागत असतानाच एक जबाबदारीने सांगतो,
मी पुन्हा येईन आणि योग्य विचार सांगेन, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार टीकाही केली.