मोठी बातमी ! शिंदे गटाला पहिला मोठा धक्का ; अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार ?

Photo of author

By Sandhya

मोठी बातमी ! शिंदे गटाला पहिला मोठा धक्का ; अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पॉवर प्ले खाते वाटपानंतर रंगणार आहे.  शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री होताच शिंदे गटातील नेत्यांसह भाजप आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे.

अशात अजित पवार यांना महत्वाची खाती देऊ नये अशी विनंती शिंदे गटातील नेत्यांनी केली होती. अशात आता अजित पवार यांना वित्त खाते देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार यांना राज्यमंत्रिमंडळात स्थानही देण्यात आलं आहे. अजित उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, खाते वाटप अजूनही झालेले नाही. राजकीय वर्तुळात चर्चा अशीही आहे की अजित पवार यांना अर्थमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद दिलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला आहे.

अशातशिंदे गटाकडून खाते वाटपावर विरोध होत असतांनाही भाजपने शिंदे गटाचा हा विरोध धुडकावून लावत अजित पवार यांना अर्थमंत्रीपद दिल्याचं दिसून येत आहे. तसे संकेतच मिळत आहे. राज्य सरकारने एक जीआर जारी केला आहे.

या जीआरद्वारे एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.  ही समिती स्थापन फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात आली आहे. एकूण पाच सदस्यांची ही समिती आहे.

या समितीत सुधीर मुनगंटीवार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुनगंटीवार यांच्या नावापुढे कंसात वनमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. उदय सामंत यांच्या नावापुढे उद्योग मंत्री आणि अतुल सावे यांच्या नावापुडे सहकार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ऊर्जा मंत्री उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे अर्थमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही.

Leave a Comment

You cannot copy content of this page