PUNE : फेसबुकवर कमेंट करणे पडले महागात; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Photo of author

By Sandhya

फेसबुकवर कंमेंट करणे पडले महागात, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

राज्य महिला आयोगाचा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या 7 जणांविरोधात पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना 5 जणांकडून रुपाली चाकणकरयांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला होता.

त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करणं या तरुणांना चांगलाच महागात पडलं असल्याचं दिसून येत आहे.

या प्रकरणी युवराज विलास चव्हाण (वय-31 रा. धायरी) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवराज चव्हाण हे रुपाली चाकणकर यांचे सोशल मीडियाचे कामकाज पाहतात.

चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 6 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुपाली चाकणकर या फेसबुकवर लाईव्ह करत असताना दोघांनी अक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, 8 जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मात्र, सुप्रिया सुळे बोलत असताना त्याचे लाईव्ह प्रक्षेपण एका टिव्ही चॅनलच्या युट्युबवर सुरु होते. त्यावेळी काही जणांनी अश्लील शब्दात कमेंट केल्या. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment