तुळजाभवानीला देशभरातील राजा-महाराजांनी अर्पण केलेले अत्यंत मौल्यवान दागिने गायब

Photo of author

By Sandhya

तुळजाभवानीला देशभरातील राजा-महाराजांनी अर्पण केलेले अत्यंत मौल्यवान दागिने गायब

तुळजाभवानीला देशभरातील राजा-महाराजांनी अर्पण केलेले अत्यंत मौल्यवान दागिने गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेली दुर्मिळ 71 नाणीही सापडत नसल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या अलंकारांबद्दल सोन्याचांदीचे मोजमाप करणारी समिती वस्तुनिष्ठ अहवाल देणार आहे. तुळजाभवानीला अर्पण करण्यात आलेल्या मौल्यवान ऐवजाचे गेल्या कित्येक वर्षात मोजमाप करण्यात आले नव्हते. हा ऐवज अनेक पेटय़ांमध्ये पडून होता.

अलिकडच्या 13 वर्षातच भाविकांनी 204 किलो सोने आणि 861 किलो चांदी देवीच्या चरणी अर्पण केली. हे सोने-चांदी मोजमाप करून वितळवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी घेतला.

त्यासाठी खास समिती गठित करण्यात आली. दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर संस्थानच्या प्रशिक्षित सराफांना पाचारण करण्यात आले. या समितीने कडक बंदोबस्तात तुळजाभवानीच्या दागिन्यांचे मोजमाप केले. यात अनेक राजा-महाराजांनी अर्पण केलेले मौल्यवान दागिने गायब असल्याचे आढळून आले.

Leave a Comment