पोलीस उपनिरीक्षकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला

Photo of author

By Sandhya

पोलीस उपनिरीक्षकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याकडे विचारपूस करीत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे घडली.

अमोल रमेश डेरे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निहाल हरपाल सिंग (35, रा. मुंबई), मंगेश लक्ष्मण गायकवाड (32, रा. रहाटणी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्यासह संजय पडवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक डेरे मेदनकरवाडी येथे गस्त घालत होते. त्यावेळी एका टपरीजवळ तिघेजण संशयितपणे थांबल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता एकाने उपनिरीक्षक डेरे यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला.

यामध्ये डेरे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट पिस्तुल, मिरची स्प्रे, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले.  

Leave a Comment

You cannot copy content of this page