राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौरा संपवून आज (दि. २६) मुंबई विमानतळावर दाखल झाले. या दौऱ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी जपानमध्ये झालेल्या प्रशासकीय बैठका आणि भेटीनंतर भारतात मोठ मोठे उद्योग येतील अशी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस जपान येथून ५ दिवसांच्या दौरा संपवून आज भारतात परतले.
या दौऱ्यामध्ये त्यांनी जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, या भेटीमध्ये विविध विषयांची माहिती मिळाली.
तसेच जपान भुमिगत मेट्रोसाठी निधी देणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. जपानमध्ये विविध अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. या दौऱ्यामध्ये परकीय गुंतवणुकीबाबत चर्चा झाल्यीचे त्यांनी यावेळी सांगितले. या चर्चेमुळे आता भारतात मोठमोठे उद्योग येतील असे सांगितले आहे.