मुख्यमंत्री झालो तर सगळ्या पोलिसांना भगव्या टोप्या देईन ; आमदार संतोष बांगर यांचं विधान चर्चेत

Photo of author

By Sandhya

आमदार संतोष बांगर यांचं विधान चर्चेत

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच झालेली  हिंगोलीत ‘निर्धार सभा’ सध्या चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांनी या सभेतून  भाजपासह शिंदे गटाचे स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी ठाकरेंनी संतोष बांगर यांना सापाची उपमा दिली. 

सभेत बोलतांना ठाकरे म्हणाले,’गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अशात आता संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं आहे. बांगर यांनी कावड यात्रेत यांनी एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले,’ बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आमची सत्ता आली तर सगळ्यांना भगव्या टोप्या देऊ.

त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सगळ्या पोलिसांना भगव्या टोप्या देईन’ असं वक्तव्य केलं आहे. बांगर यांचं वक्तव्य विधान चांगलेच व्हायरल होत आहे.

ते पुढे उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया देत म्हणाले,’ उद्धव ठाकरे यांनी येड्यांची जत्रा उभी केली. येडे काहीही करू शकत नाहीत. थोडं त्यांच्यावर अंगावर धावून गेलं, तर ते भुर्र पळून जाणारी लोक आहेत. याचा आमच्या शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही.’त्यांच्या या विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page