छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून भारतात आणण्याच्या प्रक्रीयेला वेग आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व विभागाचे सचिव तथा भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी लंडन येथे 01 ऑक्टोबरला जाणार आहेत.
नोव्हेंबर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे येण्याची शक्यात आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 03 ऑक्टोबर रोजी लंडन येथे वाघनखे भारतात आणण्यासाठी एमओयू होणार आहे. त्यानंतर येत्या नोव्हेंबर महिन्यात वाघनखे भारतात येणार आहे.
लंडनचे पंतप्रधान सुनक यांना भेटण्यासाठी वेळ मागितला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता. वाघनखांच्या सहायाने महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता.
तिच वाघनखे आता भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील जाणार आहेत.
महाराष्ट्रात वाघनखे येताच मोठा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष आहे.
म्हणून विविध उपक्रम सांस्कृतिक विभागातर्फे राबविले जात आहेत. यात शिवाजी महाराजांची होण, मुद्रा,टपाल तिकीट प्रकाशन,एक कोटी शुवभक्तांचे पोर्टल यांचेसह महाराजांची ती वाघनखे व जगदंब तलवार भारतात आणणे हे विषय आहेत.
ब्रिटन मधून वाघनखे आणण्यासाठी जीआरही काढण्यात आला आहे. वाघनखे व जगदंब तलवार वस्तू नसून ती आमची आस्था आहे. वाघनखे अपार शक्ती निर्माण करेल. ती ऊर्जा घेऊन कार्य करू,असेही मुनगंटीवार म्हणाले.