पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; सिमेंट ट्रकची वाहनांना धडक, युवकाचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात

कात्रजहून मुंबईकडे जाणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने नवले पुलाजवळ चौकात सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना पाठीमागून धडक दिली. त्यात चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले असून, एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

तर, एक पादचारी महिला जखमी झाली आहे. संदेश बानदा खेडकर (वय 34 वर्षे, रा. टिळेकर नगर, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या प्रकरणी ट्रकचालक पंकज नटकरे (वय 21, रा. बसवकल्याण, बिदर) यास सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि. 25) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पूल परिसरात सिग्नल लागल्याने वाहने उभी होती.

याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रक चालकाला आपली गाडी कंट्रोल झाली नाही. त्यामुळे तो समोरील इर्टिगा वाहनाला धडकला. यानंतर तीन ते चार वाहनांना त्याची धडक बसली.

त्यामध्ये सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर, एक पादचारी महिला जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, असे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी सांगितले.

Leave a Comment