मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गावोगावी सरकार व विविध राजकीय नेत्यांच्या विरोधात रोष तयार होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक गावांनी खासदार, आमदारांसह नेत्यांना गावात प्रवेश बंदी असलेले जाहीर फलक लावून त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अशात पुण्यातील नवले ब्रीज वर जाळपोळ चालू आहे, तसेच आंदोलकांकडून घोषणाबाजी चालू आहे.मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे.
त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आंदोलकांनी पुण्यातील नवले ब्रिज रस्ता बंद केला आहे.
गाड्यांची लांब रांगच रांग लागली आहे. काही आंदोलन नवले पूल येथे पोहचले असून त्यांनी मुंबई बंगलोर महामार्ग रोखला आहे.
यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. आंदोलकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जाळले असून काही वाहनांना आग लावले असल्याचे देखील वृत्त आहे.
यामुळे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे पोलिसांकडून आंदोलकांना विनंती केली जात आहे की ऍम्ब्युलन्स आणि शाळेच्या बसेस यांना पुढे निघण्यास मार्ग द्या, तर मराठा आंदोलकांकडूनही आतापर्यंत एका ऍम्ब्युलन्सला मार्ग देण्यात आला आहे.
दरम्यान, त्या ठिकाणी पुणे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा मराठा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे. मुंबई आणि साताऱ्या कडे जाणारी वाहतूक आडवली आहे.