
आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल झाला आहे. दर महिन्याला पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जात असतात.
तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यासाठी दर जाहीर केले असून गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. आजपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे.
19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1785.50 रुपये झाली आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर 1684 रुपये होता.
पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून 19 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे. मात्र, 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
आता एका सिलिंडरची किंमत एवढी IOCL च्या वेबसाइटनुसार, आजपासून राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 1,833 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1731 रुपयांना मिळत होता.
तर मुंबईत त्याची किंमत 1785.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1684 रुपये होती. कोलकाता येथे 1839.50 रुपयांऐवजी 1943.00 रुपयांना मिळेल, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 1999.50 रुपये झाली आहे, जी आतापर्यंत 1898 रुपये होती.