राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागणार आहे. दुपारी १२ ते १ दरम्यान राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 74 टक्के मतदान काल (रविवारी) झाले होते.
राज्यभरात अंदाजे 74 टक्के मतदान झालं. तसेच, राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी अंदाजे 185 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल देखील आज समोर येईल. पुणे जिल्ह्यातील अनेक नेत्याच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता या निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,
माजी मंत्री दत्तामामा भरणे याच्या प्रतिष्ठापणाला लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निकालकडे आता राज्याच लक्ष लागलं आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ८६.१८ टक्के मतदान मावळ तालुक्यात तर, सर्वांत कमी म्हणजेच ७३.९६ टक्के मतदान जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झाले आहे.
काल मतदान झालेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक तर, १४२ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.
जिल्ह्यातील पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या २३१ पैकी दोन ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली होती.त्यामुळे उर्वरित २२९ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
यापैकी ४३ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरित १८६ ग्रामपंचायतींसाठी आज मंतदान घेण्यात आले.
वेल्हे —८२.२४ भोर —- ८३.५० पुरंदर — ८३.३० दौंड —- ७८.८५ इंदापूर —- ७८.७८ बारामती — ८५.९२ जुन्नर —- ७३.९६ आंबेगाव —-७५.२८ खेड —- ८२.२४ शिरूर — ८०.९४ मावळ — ८६.१८ मुळशी —- ८२.१८