विजय वडेट्टीवार : सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवावा

Photo of author

By Sandhya

वडेट्टीवार

नागपूरमध्ये आज (दि. ६) विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्याचे आरोप केले.

सरकारने राज्यातील परिस्थिती पाहता अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केली. वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करण्याचं केवळ नाटक सरकार करत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून केवळ अश्वासनं देण्याचं काम सुरु आहे. किरकोळ सूट देऊन शेतकऱ्याला मदत होणार नाही. सरकारनं सरसकट दुष्काळ जाहीर करावा.

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल आहे. असे असतानाही सरकार शासन आपले दारी कार्यक्रम करण्यात मग्न आहे असे आरोप वडेट्टीवार यांनी केली.

राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपले जीवन संपवत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. ही सर्व परिस्थीती पाहता अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी आज केली.

Leave a Comment