कुर्ला टर्मिनस येथील जनआहार कॅन्टीनला आग लागण्याची घटना आज (दि.१३) दुपारी ३ च्या दरम्यान घडली. आग लागताच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुर्ला टर्मिनस येथील तिकीट बुकिंग ऑफिसच्या पोटमळ्यावर जनआहार कॅन्टीन असून त्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहेत.
याच कॅन्टीनला आग लागण्याची घटना दुपारी ३ वाजता घडली. आग लागताच बुकिंग ऑफिस मधील कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. कॅन्टीनसह बुकिंग ऑफिसला देखील आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.