
ववीत शिक्षण घेणार्या 15 वर्षांच्या शाळकरी मुलीला फिरण्यास घेऊन जातो, या बहाण्याने नेऊन तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांनाही हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अनुराग साळवे (रा. आनंदनगर, केशवनगर), गणेश म्हेत्रे (रा. शिंदेवस्ती, मुंढवा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 15 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आईबरोबर व सावत्र वडिलांबरोबर तसेच आपल्या लहान बहिणीबरोबर राहते.
तिच्या शाळेत शिकणार्या दोन मैत्रिणींचे मित्र आरोपी यांची त्यांच्यामुळेच ओळख झाली होती. दि. 29 जानेवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजता शाळेतून घरी पीडिता आली. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास अनुराग तिच्या घरी आला. त्याने तिच्या वडिलांना त्याच्या बहिणीचा वाढदिवस असल्याचे सांगितले.
तसेच, फिर्यादी मुलीला वाढदिवसाला पाठवा, असे म्हणून वाढदिवस झाल्यावर पुन्हा तिला घरी सोडतो, असे सांगितले. वडिलांची परवानगी मिळाल्यानंतर अनुरागच्या गाडीवर बसून ती मांजरीतील झेड कॉर्नरमधील झेड मॉलमध्ये गेली. तेथे अनुरागचा मित्र गणेश म्हेत्रे व तिचा मित्र आयुष हे भेटले.
तेथे काही वेळ थांबल्यानंतर तिघे त्या तिघींना त्यांच्या दुचाकीवर बसवून फिरायला नेतो सांगून मांजरी गावात जाणार्या रस्त्याने नेले व मांजरी गावातील नदीच्या पुलाच्या अलीकडील कच्च्या रस्त्याने आतमध्ये गेले.
तेथे गप्पा मारल्यानंतर आयुष आणि त्याची मैत्रीण निघून गेले. तेथे अनुराग आणि गणेश व त्यांची मैत्रीण तेथेच थांबले. मात्र, त्यांच्या मैत्रिणीला बरे वाटत नसल्याने ती तेथेच झोपली. त्यानंतर अनुराग आणि गणेश यांनी फिर्यादीबरोबर जबरदस्ती करीत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला.
तिला तिथेच सोडून त्यांच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीला घरी सोडतो, त्यांनी सांगितले. त्यानंतर ते न आल्याने पीडिता चालत चालत मांजरीतील स्मशानभूमीजवळ गेली. पहाटेपर्यंत ती घाबरलेल्या अवस्थेत तेथेच बसली.
त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनुराग दुचाकीवरून तेथे आला. त्याने तिला तिच्या घरासमोर सोडले. याबाबत तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर याबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.