विजय वडेट्टीवार : ‘गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन’

Photo of author

By Sandhya

विजय वडेट्टीवार

राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे, असं म्हणत वडेट्टीवारांनी खोचक टोला लगावला आहे.

“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे”, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासह काहीजण मंत्रालयाच्या आवारात व्हिडिओ बनवताना दिसत आहेत.

यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासंबधीची पोस्ट वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केली आहे.

पोस्टमध्ये काय म्हणालेत विजय वडेट्टीवार? “गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे.”

“नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती “मोदी की गॅरंटी” ?”, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये काही गुंडांनी काही नेत्यांची भेट घेतल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, दिवसेंदिवस सरकारचे घोटाळे समोरं येत आहेत. सरकारने क्लृप्त्या लढवणे आणि घोटाळे करणे असं सुरु केलं आहे.

मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रील तयार करतो सोबत त्याचे इतर गुंड देखील आहेत. हा कशी काय एवढी हिंमत करतो. मुख्यमंत्र्याना भेटायला जातो हे कस काय शक्य होतंय? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली, त्यानंतर पुण्यातील गुंड निलेश घायवळ याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page