संजय राऊत : “गुंड टोळ्यांचा मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँगमध्ये प्रवेश”

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे कुख्यात गुंडांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत टीका केली होती.

त्यानंतर आता सलग तिसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी आणखी एका गुंडांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याचा फोटो ट्वीट केला आहे.

यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पुण्याचे नवे पोलीस आयुक्तांनी गुंडांची घेतलेल्या परेडवर देखील टीका केली. काय म्हणाले संजय राऊत?

“पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान! काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँगमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय?

हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे. याच्यावर खुन ,खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोका मधुन नुकताच बाहेर आला आहे महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य,” संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हंटले आहे.

तर शेवटी संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. काल सरकारचे बाळराजे कोठे होते?त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते. या राज्याचे कठीण आहे,’ असे राऊतांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालयात काल शहरातील ३२ टोळ्यांतील टोळी प्रमुखांसह २६७ गुन्हेगारांची हजेरी घेण्यात आली होती. या गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्य न करण्याची तसेच रिल्स न बनविण्याची तंबी देण्यात आली.

पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे गुन्हेगारी टोळ्यांना समोरा समोर बोलावून सज्जड दम देण्यात आला होता. यावरून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page