
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. अशात पुन्हा एकदा शाळेतील मुलांना अजब सल्ला दिल्यामुळे ते चर्चेत आले आहे. संतोष बांगर यांनी हिंगोलीतील एका शाळेत विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय.
या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संतोष बांगर म्हणत आहे की,’तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका.
तसेच बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून वदवून घेतलं की, ते त्यांच्या आई-वडिलांसमोर काय बोलणार? कोणाला मतदान करायला लावणार? अस चिमुकल्यांकडून त्यांनी वदवून घेतले आहे.
ते या व्हिडिओमध्ये पुढे म्हणाले, ‘मुलांनो तुमच्या आई-वडिलांना मला मतदान करण्यास सांगा. नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका. तुम्ही जेवला नाहीत आणि आई-वडिलांनी विचारलं की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मी त्यानंतर जेवेन.’
संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलेला हा अजब सल्ला सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. शाळेत १८ वर्षा खालील मुलांना आई वडिलांना मतदान मलाच करायला लावा असे सांगितल्यामुळे बांगर यांच्यावर आता विरोधकांकडूनही टीका होत आहे,
दरम्यान तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार? या प्रश्नांची विद्यार्थ्यांकडून घोकमपट्टी करून घेतली. यावेळी शाळेतील कर्मचारी, शिक्षिका आणि बांगर यांचे कार्यकर्ते हसत होते.
तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा… नाही केल्यास दोन दिवस जेवण करू नका, असा दम विद्यार्थ्यांना देताना शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदार संतोष बांगर या व्हिडिओत दिसत आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 10, 2024
निवडणुकीत किंवा निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात प्रचारात लहान मुलांचा वापर करू… pic.twitter.com/x75XtS0Stl