चंद्रशेखर बावनकुळे : उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले…

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तुमच्याबद्दल कीव वाटू लागली. तुमची मानसिक अवस्था बिघडली आहे, राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते.

पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते, असा हितोपदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (दि.१०)  दिला आहे.

आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते. जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते.

आपली ही अवस्था आपण स्वतःच्या हाताने करवून घेतली. ‘असंगाशी संग‘ केल्यानंतर असेच होणार. देवेंद्र  फडणवीस यांच्यावर आज आपण ज्या खालच्या भाषेत टीका केली, तो तळ आम्हाला गाठता येणार नाही.

पण तुमची भाषा, तुमचे टोमणे, तुमच्या शिव्या, तुमचे नैराश्य या साऱ्याच गोष्टी हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना असेही बावनकुळे म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page