
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा आणि अटक करा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. तसेच त्यांच्या विधानांमागे कोण आहे? याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरेकर म्हणाले, त्यावेळी राजेश टोपेंसोबत रोहित पवार देखील होते. दगडफेकीचं हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं. रोहित पवार स्वतः राजेश टोपेंसोबत तिथं होते.
या सर्व प्रकराराची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. जरांगेंना शरद पवारांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचे फोन घेत होते, असं संगीता वानखेडे सांगत आहेत.