
देशासह राज्यात लोकसभा निवडणूक आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रस ( पवार गट ) गटाचे प्रमुख अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय. कारण अजित पावर गटाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १२५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय.
पदाधिकाऱ्यांच्या या कृतीने अजित पवार गट गटाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येतंय. प्राप्त माहितीनुसार, पक्षाकडून सतत अवहेलना, पक्षात मानसन्मान मिळत नाही तसेच कुणी विचारपूस करत नाही ” असे एक ना अनेक आरोप राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केलेत.
त्यांच्या या कृतीने पक्षाला मोठे खिंडार पडलंय. लोणावळ्यात पत्रकार परिषदेत या पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली. शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनोद होगले हे संघटना वाढीसाठी चांगले काम करत होते. परंतु अचानक तडकाफडकी त्यांच्या जागेवर नवीन अध्यक्ष नेमण्यात आला.
पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली तसेच होगले यांना याची कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. वारंवार पक्षातील वाद वरिष्ठांच्या कानावर टाकूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय असं पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहराचे माजी अध्यक्ष विनोद होगले.
मावळ तालुका चित्रपट आणि सांस्कृतिक सेलचे संतोष कचरे त्याचसोबत दत्तात्रय गोसावी, अमोल गायकवाड, रमेश दळवी, सलीम मण्यार, अजिंक्य कुंटे, सुधीर कदम, कृष्णा साबळे, तुषार पाडाळे, रवी भोईने, अँड गायत्री रिले यांच्यासह बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हे पाऊल उचलत असताना आम्ही लोणावळा शहरांमधील इतरही जुन्या जनता नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
ते देखील आमच्या सोबत असून पुढील काळामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. लवकरच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घोषित करू असा सूचना वजा इशारा पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला दिलाय.