ठाकरेंना दहा कोटी देऊन ओम राजेंना उमेदवारी मिळवून दिली; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Photo of author

By Sandhya

आरोग्यमंत्री तानाजी सावंत

धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांना आपण स्वतः १० कोटी रुपये पक्ष निधी दिला. एवढेच नाही तर निवडणुकीत ओमराजे यांच्या विजयासाठी स्वतःच्या खिशातले कोटीभर रुपये खर्चले आणि बेरोजगार उमेदवाराला खासदार केले असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.

आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी दहिगाव येथील सिना कोळेगाव प्रकल्पाची शेतकऱ्यांसह पाहणी केली. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, बेरोजगार खासदाराला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो की तुझे तिकीट मिळवण्यासाठी खमक्या म्हणून त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दहा कोटी रुपये चेकने दिले. त्यानंतरच उमेदवारी अंतिम झाली.

निवडून आणण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केला. आणि आता त्यांनी अचानकच पटली मारली. तुम्हाला हे मान्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांसमोरच केला.

शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार ओम राजेनिंबाळकर सडकून टीका केली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यावरही सडकून टीका केली.

ठेकेदारी, अधिकारी यांना शिव्या देणे, नंतर एकाने शिव्या द्यायच्या आणि दुसऱ्याने तोडपाणी करायची हा धंदा आहे, अशी टीका तानाजी सावंत यांनी केली. यावेळी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांचा बेरोजगार खासदार असा उल्लेख केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page