विजय वडेट्टीवार : भारत जोडो यात्रेने भाजपच्या उरात धडकी भरवली…

Photo of author

By Sandhya

विजय वडेट्टीवार

पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

शनिवारी 16 मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे. या यात्रेनिमित्त ही यात्रा यशस्वी व्हावी, यासाठी शुक्रवारी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार हे काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह ठाण्यात आले होते.

महाराष्ट्र, बिहार या राज्यातून भाजपा हद्दपार होणार असून कर्नाटक ही त्यांच्याकडे राहणार नसल्याचे भाकीत काँग्रेस पक्षाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना वर्तवले आहे.

तर अब की बार 400 पार म्हणणारे भाजप सरकार आले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे निश्चित 400 पार होतील अशी खोचक टीका ही त्यांनी यावेळी केली. याशिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशात ही चित्र बदलत असल्याचेही त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.

भविष्यात आता जे दिसते त्यात बदलाचे वारे दिसत आहे. याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला नाही. बदनामी करून बळकवलेले किल्ले हे साफ होणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

राहुल गांधींची मुंबईत होणार जोरदार सभा भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता होत असताना, त्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथे होणारी सभा ही जोरातच होईल. या सभेला इंडिया आघाडीमधील 15 मित्र पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये तेजस्वी यादव, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार आदी उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा यशस्वी होणार आणि देशात बदल निश्चितच होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment