काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल मुंबईत समारोप झाला. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात इंडिया आघाडीची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागले होते. विशेष म्हणजे शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात देखील सुरु झाली आहे.
यावेळी सभेला संभोधित करताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “महात्मा गांधी यांनी ४२ साली छोडो भारतचा नारा दिला होता. देशात जी हुकूमशाही टपलेली आहे तिला हद्दपार करण्यासाठी तुम्ही शिवाजी पार्क निवडलं त्याबद्दल आभार मानतो.
भाजप हा फुगा आहे. या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, त्यानंतर आज हिंगोलीच्या सभेत देखील उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना आपला निशाणा बनवला.
“मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर आता आडवा, आता मोदी आणि आपण समान आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. तहान भूक हरपून सगळेजण भाजपला तडीपार करण्यासाठी कामाला लागलेत.
मी लोकांच्या सभा ऐकून महाराष्ट्र भर फिरतोय, महाराष्ट्र मला कुटुंबातील सदस्य मानतात,जे पण करतोय त्यांना सांगतोय. कालच्या सभेत माझ्यावर टीका झाली.
काही मोदी भक्त म्हणतायेत उद्धव ठाकरेंची भाषा बदलली. भाजपच्या खूळखुळ्यांनो आम्ही देशप्रेमी आहोत आणि तुम्ही मोदी भक्त आहात, असे ते म्हणाले.