वंचितने महाविकास आघाडीला दिलेली मुदत आज संपली; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार?

Photo of author

By Sandhya

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज अकोल्याहून लोकसभा निवडणुकीसाठी भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. एवढंच नाही तर मागील अनेक दिवसांपासून मविआघाडीसोबत चर्चा सुरु होत्या मात्र तोडगा निघत नव्हता.

त्याच पार्श्वभूमीवर मविआसोबत युती तुटल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तर राज्यात दुसरीकडे प्रकाश शेंडगेंचा ओबीसी मोर्चा, जरांगे यांना मानणारा गट आणि इतर काही छोटे पक्ष आणि संघटना आंबेडकरांसोबत येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आंबेडकर तिसरी आघाडी स्थापणार असल्याचे बोलले जातंय. तिसऱ्या आघाडीत वंचित 29 जागा लढण्याची चिन्ह दिसून येतायेत.

मविआला दिलेलं अल्टीमेटम आज संपणार प्रकाश आंबेडकरांनी मविआला दिलेलं अल्टीमेटम आज संपणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी संदर्भात काय निर्णय घेणार? हे आज स्पष्ट होणार आहे,

तर दुसरीकडे राज्यात पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि डावे पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न आहे. कारण महाविकास आघाडीत सीपीएम दिंडोरी लोकसभा जागेसाठी आग्रही होते पण ती जागा न मिळाल्याने सीपीएममध्ये नाराजी आहे.

आंबेडकर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीविषयी चर्चा होती. ते नेमकं कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

आज मात्र त्यांनी या चर्चेवर पडदा पाडला असून मी येत्या 27 मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. तसेच, मी माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अर्ज भरणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

आम्ही साथ देत नाही, असं चित्र निर्माण केलं जातंय मविआत 15 जागांचा तिढा संपलेला नाही. ते एकत्र लढणार आहेत की, स्वतंत्रपणे लढणार आहेत, हे अजूनही ठरलेलं नाही.

आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की तुमच्यातील 15 जागांचा वाद मिटवा. मात्र आम्हीच त्यांना साथ देत नाहीत, असं चित्र निर्माण केलं जात आहे. आमच्यातील 15 जागांचा वाद मिटलेला आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी द्यावी, असंही ते म्हणाले होते.

Leave a Comment