किरीट सोमय्या : मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश फडणवीसांनी…

Photo of author

By Sandhya

किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्षातील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल मोठा खुलासा केला आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला नसता तर शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी भाजपला संपवले असते, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

याचवेळी त्यांनी ठाकरेंना घेरण्याचे आदेश कोणी दिले? याबाबत माहिती सांगितली आहे काय म्हणाले किरीट सोमय्या ?

किरीट सोमय्या यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिल्याचाही खुलासा केला. “मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असून पक्षाने मला ज्यावेळी जे सांगितलं ते मी केले.

मातोश्रीचा भ्रष्टाचार असेल किंवा हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार हे सर्व भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं, संशोधनाचं काम माझं होतं. उद्धव ठाकरे यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची माझी स्वतःची इच्छा नव्हती.

परंतु मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे. तो थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मातोश्री व त्यांच्या माफिया कंत्राटदारांपासून मुक्त करण्यासाठी मला हे भ्रष्टाचार बाहेर काढावे लागले.”

पुढे ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस व दिल्लीतील नेत्यांनी मला मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची संबंधित असेल तो भ्रष्टाचार बाहेर काढायलाच हवा अशी मुंबईसाठी माझी वचनबद्धता आहे आणि तो पक्षाचा निर्णय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने मी ते भ्रष्टाचार बाहेर काढले,” असंही सोमय्या म्हणाले.

Leave a Comment