जागावाटपात मुंबई काँग्रेसने तीन मतदारसंघांची मागणी केली होती. मात्र, दोनच मतदारसंघ मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे, अशा शब्दांत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
आपल्याला स्वतःला दक्षिण मध्य मुंबई निवडणूक लढविण्यात रस होता, अशी भावना व्यक्त करीत त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे आपणही नाराज असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
सहाही जागांवर विजयासाठी काम करू. मात्र, पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर आहे. शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करू, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या. त्यात काहीही तथ्य नाही, असे त्या म्हणाल्या.