दौंड शुगर तसेच अंबालिका, जरांडेश्वर कारखान्याचे कर्मचारी प्रचाराला आले आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली तेच कर्मचारी, अजितदादांच्या गटाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. त्या कर्मचाऱ्यांची चूक नाही ते स्वाभिमानी आहेत.
ते भेटतात, गप्पा मारतात, आणि जाता जाता सांगतात, लय हवा आहे, लोक म्हणतात कुणाची ते म्हणतात तुतारीची.. त्यामुळे आमचे कार्यकर्ते सांगतात, टेन्शन नॉट, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील काटी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बारामती लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार (ता.१२ रोजी) काटी ग्रामपंचायत मैदान, येथे आमदार रोहित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पवार मार्गदर्शन होते.
तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, युवक तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, सरपंच लोणी देवकर कालिदास आप्पा देवकर,
प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, विजयराव शिंदे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, पुणे जिल्हा प्रवक्ते दादासाहेब थोरात, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे,
ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोकाटे, एडवोकेट आशुतोष भोसले, युवक प्रदेश सचिव अरबाज शेख, युवती तालुकाध्यक्ष कु साक्षी पलंगे, शहराध्यक्ष इनायत अली काझी, शहराध्यक्ष डॉ. रेश्मा शेख, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात सत्ता बदल होणार – पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, देशात सत्ता बदल होणार म्हणजे होणारच, आपल्याला शरद पवार साहेबांबरोबर राहायचे आहे. आपले विरोधक फोन करतील दबाव तंत्र वापरतील, बँकेतून लोन द्यायला नाही म्हणतील, काय पिढीशी बँकेचे कर्मचारी प्रचारासाठी फिरता येते का ? कळते आहे. त्यांना सांगा पिडीसीसी बँक आमची आहे.
तुम्हाला कोणी अधिकार दिला प्रचार करायचा ? असू द्या तरी पण त्यांचे कर्मचारी एकदम ओके तुतारी आहे, असे आम्हाला सांगतात अशी ही माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. कर्मचारी मतदान मागायला का पाठवले तर येथील कार्यकर्त्यांवर विश्वास नाही. पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही. असा घणाघात अजित पवारांचे नाव न घेता रोहित पवार यांनी केला.