शरद पवार : ‘एकनाथ खडसेंवर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ’…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

राज्यात याआधी कधीच कोणावर व्यक्तिगत टीका केली जात नव्हती. पण सध्या व्यक्तिगत टीका केली जात आहे. या टीकांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.

कदाचित ही वेळ एकनाथ खडसे यांच्यावर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी. तसेच एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्‍यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबच्या भूमिकेवर भाष्य केले.

तसेच एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही.

जयंत पाटील यांना माहीत असेल. ते संघटनेचे काम पाहतात. या भागात ज्यांचा प्रभावीपणे काम करण्याचा लौकीक आहे. त्यामध्ये एकनाथ खडसे सुद्धा आहेत.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Comment