उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘पंतप्रधान मोदींची ऑफर नाही, तर तो पवारांना सल्ला होता…’

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तसंच पुणे लोकसभेची निवडणूक दिवसेंदिवस रंगत वाढू लागलीये. त्यामुळे आता भाजपकडून पुण्याचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहोळांसाठी निवडणुकीची सूत्र स्वत:कडे घेतलीय.

काल रात्री फडणवीस पुण्यात मुक्कामी होते. तर, आज पुण्यात पत्रकार संघाच्यावतीने देवेंद्र फडणवीसांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुण्याच्या जागेकडे सर्वांचे लक्ष आहे. पुण्याची मेट्रो ही पंतप्रधान मोदींनी दिलेली सर्वात मोठी देन असून, शाश्वत शहर होण्याच्या दृष्टीने पुण्याची वाटचाल सुरू आहे. हा मोदींच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. असं फडणवीस यावेळी म्हणाले.

गद्दार, खुद्दार यावर निवडणूक जिंकता येत नाही – नरेटिव्हने निवडणूक जिंकता येत नाही. गद्दार, खुद्दार यावर निवडणूक जिंकता येत नाही. विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, आम्ही विकासावर बोलतो.

आम्ही 45 जागा जिंकणार अशी घोषणा देणाऱ्यांना कुठल्या आम्ही तीन जागा सोडल्या ते विचारतो. पण बारामती आम्ही 100 टक्के जिंकणार आहोत.

पहिल्या टप्प्यात नागपूर माझे हेड क्वार्टर होतं. दुसऱ्या टप्प्यात संभाजीनगर होतं. आता पुणे आहे. यानंतर मुंबई असणार आहे. मला आणि गिरीश महाजनांना आत टाकण्याचा संपूर्ण कट रचला गेला होता. एका पोलीस आयुक्तांना ते काम देण्यात आल होतं.

त्याचे मी व्हिडिओ सहित पुरावे दिले होते. असं खुलासा देखील फडणवीस यांनी यावेळी केला. मोदींची ऑफर नाही, तर तो सल्ला होता – मोदींची शरद पवारांना ऑफर ही बातमी चुकीची आहे.

ती ऑफर नाही, तर तो सल्ला आहे. शरद पवार बारामती हरणार आहे. उद्धव ठाकरे आणि पवार दोघेही डूबत्या नावेत बसायला निघाले. त्यांचे राजकीय मनसुबे पूर्णत्वाला न्यायचे असेल तर त्यापेक्षा आमच्यासोबत या हा सल्ला मोदींनी दिला. असं ते म्हणाले.

उध्दव यांना मी गांभीर्याने घेत नाही – उध्दव यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांना कुठल्यातरी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घालून द्या असा त्यांच्या जवळच्या लोकांना सल्ला आहे. आम्ही घर फोडत नाही आणि पक्षही फोडत नाही.

फक्त संधी मिळाली तर ती सोडत नाही. जे सोबत येवू इच्छितात त्यांना सोबत घेतो. मशिदीत मोठ मोठे स्क्रीन लावून कुणाला मतदान करा आणि करू नका सांगितलं जात आहे. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय.

Leave a Comment

You cannot copy content of this page