शरद पवार : मोदींचा आत्मविश्वास हरवला…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास हरवला आहे. त्यामुळेच ते प्रचार सभांतील भाषणांतून जात, धर्मावर बोलत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे हे माहीत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक दौर्‍यावर आलेल्या शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अर्थसंकल्पाचे विभाजन करून 15 टक्के अर्थसंकल्प मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवायचा, असा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता.

यासंदर्भात पवार म्हणाले की, मोदींचे हे विधान बेजबादारपणाचे आहे. संसदेत मांडला जाणारा अर्थसंकल्प हा देशाचा असतो. अर्थसंकल्प कधीही एका जाती-धर्माचा असू शकत नाही.

पंतप्रधान मोदी यांच्याकडे प्रचारात सांगण्यासारखे दुसरे काहीही नसल्यामुळे ते लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पवार म्हणाले. होय,

अजित पवार खरोखर आजारी! बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यात तसेच महायुतीच्या प्रचाराला त्यांची गैरहजेरी दिसत आहे.

यावरून विविध वावड्या उठल्या असताना आता शरद पवारांनीही यावर भाष्य केले आहे. पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरेच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसावेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page