पंतप्रधान मोदी : देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे…

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान मोदी

देवानेच मला पाठवलं आहे. कारण, माझ्यामधील शक्ती ही साधारण नाही ती देवानेच मला दिलीये असं वाटतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी ‘न्यूज१८’ ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी हा दावा केलाय. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांच्या त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणतात की, ‘माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचं मी तिच्या पोटीच जन्म घेतलाय.

पण, तिच्या निधनानंतर, मला विश्वास वाटायला लागला की माझ्यातील शक्ती ही साधारण नाही. देवानेच खास शक्ती देऊन मला पाठवलं आहे. माझ्याकडून काही तरी करून घेण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.’

ही शक्ती केवळ एका साधारण शरीरात असू शकत नाही. पण, देवानेच माझ्यावर कृपा केली आहे. मला वाटतं देवाने काहीतरी चांगलं करण्यासाठी मला क्षमता, प्रेरणा दिली आहे. मी केवळ एक साधन आहे. त्यामुळे मी जे काही करत आहे, ते देवानेच मला करायला सांगितलंय असं मी मानतो, असं मोदी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका लावला आहे. त्यांची ऊर्जा अनेकांना लाजवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी यांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता.

२०१९ पेक्षा २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये जास्त ऊर्जा दिसत आहे असं पत्रकार म्हणाला. यावर बोलताना मोदींनी ही दैवी शक्ती असल्याचा दावा केला. ते असंही म्हणाले की, कम्युनिस्ट लोक मला वेड्यात काढतील. पण, मला तर असंच वाटतं. मी चुकीचा असू शकतो.

पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. ७३ वर्षीय नरेंद्र मोदी गेल्या १० वर्षातील आपल्या कामाचा लेखाजोखा लोकांच्या समोर ठेवत आहेत. लोक त्यांना पुन्हा संधी देण्याती शक्यता आहे.

Leave a Comment