Pune : अनिश-अश्विनीच्या न्यायासाठी आंदोलन…

Photo of author

By Sandhya

अनिश-अश्विनीच्या न्यायासाठी आंदोलन

पोर्शे कार अपघातात जीव गमावलेल्या अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी (दि.26) पुणे महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक पुणेकरांनी यात सहभाग घेतला होता.

समाजसेवक दुष्यंत दुबे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर येथील महापालिका भवनाच्या गेटजवळ एकत्र येऊन पुणेकरांनी रविवारी आंदोलन केले.

या वेळी अश्विनी आणि अनिश यांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ पत्रे लिहिली आणि अपराध्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

पुढील आठवड्यात आंदोलनकर्ते अनिश आणि अश्विनी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

You cannot copy content of this page