पुणे | मोबाईलवर बोलण्याच्या नादात, कार भिंत तोडून कोसळली; पुण्यातील थरारक प्रकार समोर

Photo of author

By Sandhya


पुणे : विमाननगर पतीसरातील थरारक अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही. ही घटना विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता घातली आहे. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी कार खाली पडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कार पुढे घेऊन जाण्याऐवजी चालक चुकून कार मागे घेऊन गेला. इमारतीच्या पार्किंगची भिंत तकलादू होती. कारने भिंतीला धडक दिली. भिंत तुटली. कार उलट्या दिशेने खाली कोसळली. दरम्यान, कारचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. कार खाली पडल्याने आजूबाजूचे लोकही घाबरले. सुदैवाने खाली कोणी नव्हते. या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही.पाहुयात वायरल व्हिडिओ

Leave a Comment

You cannot copy content of this page