बीड तालुक्यातील धावज्याचीवाडीत अंगणवाडी सेविकेचा तिच्या पतीनेच निर्घुण खून केला. अंगणवाडी सेविका मंगल गुंडिराम भोसले (वय ४५) या सकाळी शेतात गोठ्यातील जनावरे सोडवण्यासाठी गेल्या असता,
त्यांचा पती गुंडीराम भोसले याने पाठीमागून येऊन लोखंडी खोर्याचा दांडा डोळ्यात मारून जखमी गंभीर जखमी केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे.
यानंतर गुंडीराम भोसले (वय 50) याने नेकनुर पोलीस ठाण्यात येऊन मी माझ्या बायकोला मारून टाकले असल्याची स्वत:चं माहिती दिली. आयपीएस पंकज कुमावत, नेकनुर ठाण्याचे एपीआय विलास हजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.