आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत दुपटीने वाढ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

आपत्तीग्रस्तांना आता १० हजार रूपये आर्थिक मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२८ जुलै) विधानसभेत बोलताना स्पष्ट केले.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना यापूर्वी ५ हजार रूपये इतकी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात होती. त्यामध्ये वाढ करून आता १० हजार रूपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचे काही निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज मांडले.

विधानसभेतून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, असे मत पावसामुळे झालेल्या नुकसानीवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment