

जेजुरी : बेलसर वाघापूर रस्त्यावर पहाटे अडीच वाजता अशोक लेलंड व आयशर गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार तर 14 जन गंभीर जखमी झाले आहेत.
अशोक लेलँड मधिक भाविक जेजुरीला देवदर्शनासाठी निघाले होते.
अशोक लेलँड या गाडीतील चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे, वय 35 व आशाबाई बाळकृष्ण जरे वय 50 रा जरेवाडी ता खेड जि पुणे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.तर मंगल तोत्रे,ज्ञानेश्वर तोत्रे ,तानाजी तोत्रे ,अनुष्का तोत्रे,राहुल तोत्रे,विलास तोत्रे,बाळू तोत्रे,अश्विनी तोत्रे,तनिष्का तोत्रे,ओंकार करंडे,मिरा करंडे,मंगल जरे,बाबाजी करंडे,जितेंद्र तोत्रे, हे जखमी झाले आहेत.जखमींना जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जेजुरी पोलिसांनी दिली माहिती अशी की खेड तालुक्यातील जरेवाडी येथून सर्व भाविक अशोक लेलँड छोटा टेंपोने जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी रविवारी मध्यरात्री निघाले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वाघापूर बेलसर रस्त्यावर समोरून येणाऱ्या आयशर गाडीने या लेलँडला जोरात धडक दिली. देवदर्शना जाण्यापूर्वीच पूर्वीच पहाटे अडीच वाजता हा अपघात झाला. जखमींना तातडीने जेजुरी येथील आय सी यू या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत