
पुणे:
वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील न्याती एलान सेंट्रल साऊथ सोसायटीजवळील रस्त्यावर दोन वाहने रेसिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने तात्काळ कारवाई करण्यात आली. या घटनेत महिंद्रा कंपनीची थार (MH-12-VQ-8218) आणि स्कॉर्पिओ (MH-12-XX-4951) या वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी वाहतूक शाखेच्या मार्फतीने मोटार वाहन कायद्याच्या कलम ३(१)/१८१ (अपघातास कारणीभूत वर्तन), १८४ (धोकादायक ड्रायव्हिंग), १९४बी(१) (वेगवान रेसिंग), १३९/१७७ (नियमांविरुद्ध वागणूक) अंतर्गत गाड्यांवर कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलीस उपायुक्त (परिसर ४) *श्री. हिम्मत जाधव, येरवडा विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त **श्रीमती प्रांजली सोनवणे, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक **श्री. युवराज हांडे, पोलीस उपनिरीक्षक *मनोज बागल आणि वाहतूक विभाग प्रभारी सहा. नि. गजानन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
आवाहन
पोलिसांनी जाहीर केले आहे की, शहरातील रस्त्यांवर अनियमित वेग, रेसिंग किंवा धोकादायक ड्रायव्हिंग केल्यास कडक कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. नागरिकांनी याबाबत सजग राहून कोणत्याही अशा घटनेची माहिती पोलिसांना द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.