पाबळ गावातील होर्डिंग व फ्लेक्स विरोधात ॲड. दीपक चौधरी आक्रमक , विभागीय आयुक्तांसह पोलीस अधिक्षकांकडे दाखल केली तक्रार

Photo of author

By Sandhya



सद्या सर्वत्र यात्रा, उत्सव सुरू असल्याने ग्रामीण भागांतून अनेक गावांमधून उत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर, फ्लेक्स व होर्डिंग पहायला मिळतात . यामुळे गावातच तरुणांमध्ये अनेकदा तणाव पहायला मिळतो . अपघाताची भितीही असते तसेच गावाचे गावपण हरवून जाते . पाबळ गावातही जिकडे तिकडे प्लेक्स व बॅनर पहायला मिळतात . या अनधिकृत बॅनरविरोधात ॲड . दीपक चौधरी हे आक्रमक झालेले असून त्यांनी पाबळ ग्रामपंचायत गावातील स्थानिक पोलीस स्टेशनपासून ते विभागीय आयुक्तांपर्यंत तक्रार दाखल केली असून कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे .

Leave a Comment