विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 गावच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न गेली पंधरा वर्षे राजकीय व्यासपीठावर तरंगत असून अजून मंजुरी न मिळाल्यामुळे नुकतीच या गावातील सरपंचांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत ही गावे कर्नाटकला जोडण्याची मागणी केली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दुष्काळी गावातील सरपंचाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर गेले.
आज सकाळी 7.30 वाजता त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समवेत भेटून पाणी प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माधवानंद आकळे(हाजापूर), सुनील थोरबोले(रड्डे), संजय पाटील(येड्राव), बिरूदेव घोगरे (निंबोणी) ,लक्ष्मण गायकवाड(भाळवणी), सचिन चौगुले(जालीहाळ), ऋतुराज बिले (पाठखळ),प्रशांत साळे (लक्ष्मी दहिवडी)आधी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.