अजित पवार : वाहतूक कोंडी थांबवा, पाणी साचू देऊ नका…

Photo of author

By Sandhya

अजित पवार

शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांना पावसात अडचण होऊ नये म्हणून दक्षता बाळगावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्रभारी पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुणे शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए यांनी समन्वय ठेवावा. झाड पडल्यास आधुनिक यंत्राचा वापर करून रस्ता वाहतुकीसाठी त्वरित मोकळा करावा.

कात्रज ते रावेत चौक पुलावर पाणी येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने उपाययोजना करावी. महापालिका आयुक्त भोसले म्हणाले , शहरात साडेतीन हजार कचरावेचक नियुक्त केले आहेत. पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांचकेी माहिती संकलित ली आहे. तेथे चेंबर्स स्वच्छ करण्यात आली असून, त्यावर जाळ्या टाकण्यात आल्या आहेत.

वॉर्ड स्तरावर ४६ अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक वार्डला अधिकचे १५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. वार्डनिहाय अतिरिक्त निधी पुरविण्यात आला आहे. शहरातील १,८०० अनाधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या सूचना – आपत्तीच्या ठिकाणी महानगरपालिकेने वेगाने प्रतिसाद द्यावा. – शहर व परिसरातील धोकादायक जाहिरात फलक त्वरीत काढावेत. – वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे रत्यावरील अतिक्रमण काढावेत. – जाहिरात फलकांचे सुरक्षा आॅडिट करावे. – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील धोकादायक जाहिरात फलक त्वरित काढावेत – नियमबाह्य जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करा वारजे येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली. त्याचा त्रास प्रवाशांना करावा लागतो. तसेच हिंज़वडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा विषयही .बैठकीत मांडण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, वारजे जंक्शनजवळील सेवा रस्ता रुंदीकरणासाठी कार्यवाही करावी. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे. त्यासाठी आवश्यकता असल्यास अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल.

Leave a Comment