पुण्यातून एर्टिका कार भाड्याने घेऊन नाशिकला जाताना त्या गाडीतील प्रवाशांनी आळेखिंडीत कार चालकाचा गळा आवळून खून करून कार चोरून नेल्याची घटना 27 जानेवारी रोजी घडली होती.या घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली होती.या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन सिसिटीव्ही फुटेज व आसपास चौकशी सुरु केली.मृत कारचालक राजेश बाबुराव गायकवाड वय 56 वर्ष यांचा मोबाईल पुणे नाशिक महामार्गावर संतवाडी येथील हॉटेल समाधान जवळ सापडला होता.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथक स्थापन करून संपूर्ण महामार्गावरील सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले.सदर एर्टिका कार माळशेज घाटाकडे गेली असून त्यामध्ये तिघेजण बसल्याचे आढळून आले.नंतर ही गाडी नाशिक जवळील कसारा घाटात सोडून देण्यात आली. या घटनेतील आरोपी हे नाशिक परिसरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खबरीनुसार मुख्य आरोपी युवराज मोहन शिंदे (रा. सातपूर, जि. नाशिक), विशाल आनंदा चव्हाण,मयूर विजय सोळसे,ऋतुराज विजय सोनवणे हे तिघेही रा. गंगापूर रोड, नाशिक यांना अटक करण्यात आली.सर्व आरोपी हे 22 ते 30 वर्ष वयोगटातील असून सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी यापूर्वीही असे गुन्हे केल्याचे कबुल झाले.सदरची कामगिरी ही जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे,स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप सपकाळ,पोलीस सबइन्स्पेक्टर अमितसिंद पाटील,आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर,पोलीस सबइन्स्पेक्टर चंद्रशेखर डुंबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दिपक साबळे,राजू मोमीन,संदीप वारे, अक्षय नवले,विक्रम तापकीर, निलेश सुपेकर,विनोद गायकवाड,यांनी केली आहे.