अल्लू अर्जुनची अटक: पुष्पा 2 च्या प्रीमियरमधील चेंगराचेंगरीमुळे गोंधळ

Photo of author

By Sandhya

साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे पुष्पा टू च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगरा चेंगरीत एका महिलेच्या झालेल्या मृत्यूबाबत हैदराबाद पोलिसांकडून अल्लू अर्जुन वर ही कारवाई करण्यात आली आहे चिकडपल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे चार डिसेंबरला पुष्पा टू च्या झालेल्या प्रीमियर वेळी मोठी गर्दी उसळली होती त्यावेळी अल्लू अर्जुन थिएटर मध्ये आल्यानं त्याला बघण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली त्यावेळी झालेल्या गोंधळात चेंगरा चेंगरी झाली ज्यामध्ये एका महिलाचा मृत्यू झाला होता त्यानंतर अल्लू अर्जुन विरोधात एफआयआर दाखलही करण्यात आला होता त्याच प्रकरणात आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय अल्लू अर्जुनला कोणत्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे पाहूयात या व्हिडिओ मधून…

सगळ्यात आधी अल्लू अर्जुनला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे ते बघूयात हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये 4 डिसेंबरला झालेल्या चेंगरा चेंगरीत रेवती नामक एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा मुलगा गंभीर रित्या जखमी झाला होता यानंतर अल्लूअर्जुन विरोधात एक एफआयआर दाखल करण्यात आली त्यानुसार बीएनएस च्या सेक्शन 105 आणि 118 एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता बीएनएस च्या सेक्शन 105 नुसार सदोष मनुष्यवधाचा तर कलम 118 एक नुसार लोकांच्या जीविताला हानी पोहोचवल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे अल्लू अर्जुनला झालेली ही अटक सध्या चर्चेचा विषय ठरते आता ज्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाली त्या प्रीमियर वेळी नक्की काय झाला ते बघूयात पुष्पा टू थिएटर मध्ये रिलीज झाला तो पाच डिसेंबरला पण त्याआधीच पुष्पाचे प्रीमियर झाले कित्येक ठिकाणी तिकिटांचे रेट वाढवून तर कुठे इतर जुळण्या करूनप्रीमियर आयोजित झाले आता पिक्चर रिलीज होण्याच्या काही तास आधी आपल्याला बघायला मिळेल म्हणून हे प्रीमियर शो सुद्धा हाऊसफुल झाले असाच एक शो होता हैदराबादच्या संध्या 70 mm थिएटर मध्ये आरटीसी एक्स रोड हे हैदराबाद मधलं थिएटर हब इथल्या कॉम्प्लेक्स मध्ये सगळ्यात पहिलं थिएटर हे संध्या 70 mm बांधलं गेलं अर्थात या थिएटरची हाईप मोठी इथं पिक्चर पाहिली की बादशाह विषय याच थिएटरमध्ये बुधवारी 4 डिसेंबरला पुष्पाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता ज्याला अपेक्षेप्रमाणे गर्दी सुद्धा झाली होती आता ही गर्दी झाली होती अल्लू अर्जुनलामोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठीची पण या गर्दीला मॅनेज करायचं गणित बिघडलं कारण स्वतः अल्लू अर्जुनच या थिएटरमध्ये दाखल झाला जसा अल्लू अर्जुन आला तशी लोकांची त्याला बघण्यासाठीची त्याला भेटण्यासाठीची गडबड वाढली एक तर नियोजन फक्त प्रीमियरचं होतं पण अल्लू अर्जुन पूर्वसूचना न देता आला असं सांगण्यात येतंय पण ज्याला मोठ्या स्क्रीनवर बघायला गर्दी झाली होती तोच प्रत्यक्षात आल्यानं एकच गोंधळ उडाला पुष्पा टू चा प्रीमियर शो बघायला दिलसुख नगरच एक कुटुंब आलं होतं यात 39 वर्षांच्या रेवती त्यांचे पती भास्कर श्रीतेज आणि सावनिका ही नऊ आणि सातवर्षांची मुलं असं हे कुटुंब आलं होतं ज्यावेळी अल्लू अर्जुन थिएटर मध्ये आला तेव्हा सगळ्या बाजूचे फॅन्स एकाच दिशेला जायला निघाले गर्दीचं नियोजन फसलं आणि मोठी चेंगरा चेंगरी झाली ज्यात रेवती आणि श्रीतेज अडकले आणि बेशुद्ध पडले ही चेंगरा चेंगरी इतकी वाढली की फॅन्सला बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला त्यानंतर पोलिसांनी रेवती आणि श्रीतेशला गर्दीतून बाहेर काढलं त्यांना सीपीआर सुद्धा देण्यात आला त्यानंतर या दोघांनाही विद्यानगरच्या दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं पण तिथं रेवती यांना मृत घोषित करण्यात आलं तर श्रीतेशचीतब्येत गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली होती साधारण 10:30 वाजण्याच्या सुमारास अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला आणि त्यानंतर हा सगळा झाला होता जेव्हा प्रीमियर शोह स्क्रीनिंग संपलं त्यानंतर अल्लू अर्जुन थिएटर मधून बाहेर आला त्याची गाडी गर्दीत शिरल्यावर त्यानं सनरूफ मधून बाहेर येत लोकांना बाजूला सरकण्याची विनंती केली आणि मग तो पुढे निघाला या सगळ्यावरून अलू अर्जुन आणि पुष्पा टू च्या टीम वर एकत्रित टीका झाली कारण संध्या 70 mm हे प्रचंड गर्दी असलेलं थिएटर प्रीमियर शोला अल्लू अर्जुन येईल अशी कल्पना चाहत्यांना नव्हती आणिथिएटरच्या मॅनेजमेंटला सुद्धा या सगळ्या वरून मात्र अल्लू अर्जुन आणि पुष्पाच्या टीम वर टीका झाली कारण संध्या 70 mm हे प्रचंड गर्दी असलेलं थिएटर प्रीमियर शोला अल्लू अर्जुन येणार हे जसं चाहत्यांना माहीत नव्हतं त्याचप्रमाणे ते थिएटरच्या मॅनेजमेंटला सुद्धा माहीत नव्हतं त्यामुळे अल्लू अर्जुन तिथे कसा येणार तो आल्यावर गर्दीचं नियोजन कसं असणार याची काहीच तयारी नव्हती अलू अर्जुन अचानक येण्यामुळे हे सगळं होणं अपेक्षित असताना गर्दीमुळे दुर्घटना होऊ शकते हे ठाऊक असताना अलू अर्जुन फक्त प्रसिद्धीसाठी चाहत्यांच्या जीवाशी खेळ केला का हे सगळं झाल्यावर तोस्वतः गाडीतून कसा बाहेर पडला अशी टीका अल्लू अर्जुन आणि पुष्पाच्या टीम वर झाली दरम्यान पोलिसांनी संध्या थिएटरच्या व्यवस्थापकांविरोधात तर अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला होता पुष्पा टू ची टीम प्रीमियर साठी येणार असल्याची कोणतीही सूचना पोलिसांना देण्यात आली नव्हती असंही पोलिसांनी नमूद केलं होतं दरम्यान अल्लू अर्जुन एफआयआर मधून आपलं नाव वगळण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे पण ही याचिका अजून सुनावणीसाठी आली नसल्यानं अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे यासोबतच संध्या थिएटरचे मालक आणि इतरदोन कर्मचाऱ्यांना या आधीच अटक झाली होती दरम्यान अल्लू अर्जुनला आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे आता न्यायालय नक्की काय निर्णय देणार अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment

You cannot copy content of this page