अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

Photo of author

By Sandhya

अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करीत तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी (रा. काठे गल्ली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, 30 एप्रिल 2021 ते एप्रिल 2023 या कालावधीत नानावली, गंगापूर रोड, कॉलेजरोड व तपोवन परिसरात विनयभंग करीत धमकावले. या प्रकरणी धीरज विरोधात विनयभंगासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, त्याला गजाआड केले आहे.

Leave a Comment