अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार ; तब्बल 18 इंजेक्शनच्या हातात सुया, धक्कादायक प्रकार!

Photo of author

By Sandhya

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात बालनिरीक्षणगृहातून येरवडा मनोरुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा व त्याच्या हातात तब्बल 18 इंजेक्शनच्या सुया आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणात येरवडा पोलिसांनी अत्याचार करणार्‍या संबधित 25 वर्षीय एकासह एक परिचारिका व चार सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 16 वर्षीय मुलाला सुरुवातीला येरवडा येथील बाल न्यायमंडळाच्या निरीक्षणगृहात दाखल केले होते. त्यानंतर त्याला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते.

तेथे अगोदरच पॉस्कोच्या गुन्ह्यातील एक 25 वर्षांचा युवक दाखल होता. यावेळी 16 वर्षीय मुलावर त्या 25 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केले. तसेच रुग्णालयातील बॅराकीमध्ये अल्पवयीन मुलगा 26 जून रोजी आराम करत असताना रुग्णालयात काम करणारी एक परिचारीका आणि चार अनोळखी सुरक्षा रक्षकांनी भुलीचे इंजेक्शन दिले.

या वेळी त्याच्या डाव्या हाताला दुखापत केली. त्याच्या घरच्यांनी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे हाताचा एक्सरे काढला. एक्सरेमध्ये त्याच्या हातात इंजेक्शनच्या अठरा सुया आढळल्या. त्यावरून अत्याचार तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page