अमृता देशमुखची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये एन्ट्री

Photo of author

By Sandhya


मुंबई: सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. कलाकरांचा सहज अभिनय व अफलातून विनोद यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसते. कलाकारांबरोबरच या शोचे सूत्रसंचालन करत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कमेंटसने लक्ष वेधून घेताना दिसते. तर अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक हे या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कॉमेडिची हॅट्ट्रिक असे या नव्या पर्वाचे नाव असून या पर्वात काही नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. नवे कलाकार, नवे स्किट्स. त्यातच आता येत्या भागात महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात अभिनेत्री अमृता देशमुख ची एन्ट्री होणार आहे. विशेष पाहुनी कलाकार  दिसणार आहे.

              अमृता देशमुख आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एन्ट्री घेणार आहे. अमृता देशमुख आता या सर्व कलाकारांबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर व ओंकार राऊत या तिघांविषयी बोलायचे तर हे तिघे याआधी एका मालिकेत दिसले होते. ८ वर्षांआधी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कॉलेजमधील तरूणाईवर आधारित ही मालिका होती. त्यांच्यातील मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते. आता २०१६ नंतर हे तीन कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात अमृताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अमृता या शोमध्ये पाहुणी म्हणून झळकणार आहे. या प्रहसनामध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, रसिका वेंगुर्लेकर, मंदार मांडवकर आणि अमृता देशमुख असे कलाकार एकत्र दिसणार आहेत. आता या प्रहसनात किती धमाल करतील हे कलाकार आणि अमृता देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्यजत्राच्या प्रहसनात पाहायला मिळेल. त्यामुळे तिचे चाहते फार उत्सुक आहेत. येत्या आठवड्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या भागात अमृता दिसणार आहे.  त्यामुळे पाहायला विसरू नका “महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडिची हॅट्ट्रिक” सोमवार  ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर. 

Leave a Comment

You cannot copy content of this page