अनिल देशमुख : ‘मला कोणत्याही क्षणी अटक करतील…’

Photo of author

By Sandhya

अनिल देशमुख

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला अडकवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणात देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात देशमुख यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

फडणवीस हे मागील चार वर्षे पूर्वीची घटना उकरून काढत असून माझ्याविरुद्ध दिल्लीच्या मदतीने सीबीआयमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलिस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, असा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे.

मला मिळालेल्या माहितीनुसार माझ्यावर रेट टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आहे. दिल्लीच्या मदतीने ते ईडी आणि सीबीआयला हाताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणत असल्याची टीका देखील देशमुखांनी केली आहे.  

Leave a Comment