सासवड : विद्यालयात आज दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला या क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री. निलेश जगताप सर ( सचिव महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन, शारीरिक शिक्षण संचालक, पुरंदर ज्युनिअर कॉलेज सासवड,अध्यक्ष पुरंदर तालुका क्रीडा शिक्षक संघ, थायलंड येथे झालेल्याआशियाई स्पर्धेसाठी भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या व्यवस्थापक पदी निवड ) हे उपस्थित होते. तसेच पालक शिक्षक संघाचे पालक प्रतिनिधी ही उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्राचार्या मा. रेणुका सिंह मर्चंट यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन व उपस्थित पालक प्रतिनिधींचेही पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवात इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निवड झालेले खेळाडू कु. रविराज विकास भारती(१० वी), कु.ओम विश्वास झगडे (१०वी), कु. अनुराग भगवान चव्हाण(११ वी) यांनी आणलेल्या क्रीडा ज्योतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.
गांधी,नेहरू, टागोर, टिळक व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास केले. त्यानंतर सर्वांनी क्रीडा प्रतिज्ञा केली. सहावी व सातवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी डंबेल्स व घुंगुर काठी कवायतीचे प्रात्यक्षिक अतिशय शिस्तबद्ध व लयबद्ध रित्या सादर केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करून स्पर्धांना सुरुवात झाली. १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे,४०० मीटर धावणे,५० मी. अडथळा शर्यत,८०मी. अडथळा शर्यत,४०० मी रिले शर्यत,गोळाफेक या, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन विजय मिळविला.
कोणतेही यश मिळवण्यासाठी सराव,सातत्य,चिकाटी,परिश्रम आत्मविश्वास असेल तर आपण यशाची उंच उंच शिखरे पार करू शकतो. हे या मुलांनी दाखवून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे .*
स्पर्धा नंतर माननीय प्राचार्या रेणुका सिंह मर्चंट मॅडम यांनी विद्यार्थ्यांना६९ वर्षीय सर्वात ज्येष्ठ आयर्नमॅन झालेले श्री नवनाथ रघुनाथ झिंजुर्णे यांच्या विषयी माहिती देऊन क्रीडा व आरोग्य विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.क्रीडा केवळ शारीरिक
विकासासाठी नाही तर मानसिक आणि सामाजिक वाढीसाठी देखील महत्त्वाची आहे विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंह मर्चेंट मॅडम, उपप्राचार्या सौ.सुषमा रासकर मॅडम तसेच ज्युनियर विभाग प्रमुख सौ. उज्वला जगताप मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.स्वाती जगताप मॅडम तसेच सर्व शिक्षक यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चित्ररेखा केसकर मॅम व सौ.शीतल बोरुडे मॅम यांनी केले. तसेच या स्पर्धेसाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. संतोष गलांडे सर,सौ.शितल बोरुडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला.