पुणे -नाशिक महामार्गावरील कळंब हद्दीत पुन्हा एकदा घडला भीषण अपघात

Photo of author

By Sandhya

पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब बायपास येथील आप्पाच्या धाब्याजवळ काल रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा इनोव्हा कार व हुंदाई वेरणा कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले असल्याने या भागात अपघाताचे सत्र सुरूच आहे. सदर अपघातात शुभम भालेराव (वय 28 वर्ष), श्रद्धा भालेराव (वय 23 वर्ष ) या नारायणगावात राहणाऱ्या इनोव्हा गाडीतून जाणारे जखमी झाले असून, कृष्णा गमे हा वेरणा गाडीतील युवकही जखमी झाला आहे.
कळंब हद्दीत याआधी 8 डिसेंबर रोजी ट्रक व आयशर टेम्पोची धडक तसेच 12 डिसेंबर रोजी आयशर टेम्पो आणि पीकपची धडक होऊन पीकप चालक ठार होऊन त्याच रात्री त्याचठिकाणी पुन्हा एसटी व मोटारसायकल यांची धडक होऊन मोटारसायकल चालक ठार झाला होता.आठ दिवस उलटत नाही तर काल कळंब हद्दीतच पुन्हा इनोव्हा कार व वेरणा कार यांचा भीषण अपघात झाला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे, सहायक फौजदार निघोट यांनी घटनास्थळी जाऊन जखमी व्यक्तींना उपचारासाठी मंचर येथील सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात येऊन घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.दरम्यान कळंब हद्दीत अपघाताचे सत्र सुरु असल्याने याठिकाणाहून जाताना वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page